रोहित शर्मा लवकर पुनरागमन करावं अशी टीम इंडियाची इच्छा आहे. पण कुठला धोका पत्करण्याच्या मूडमध्ये नाहीय असं रोहितने पुढे सांगितलं. हे सर्व NCA च्या निर्णयावर अवलंबून आहे, असं रोहित म्हणाला. “100 नाही, 200 टक्के खात्री असेल, तेव्हाच शमीला खेळवण्याचा चान्स घेऊ. जर एनसीएला वाटतं की, तो रिकवर झालाय, खेळण्यासाठी पूर्ण फिट आहे तर मला खरोखरच आनंद होईल” असं रोहित शर्मा म्हणाला.आर अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेट निवृत्ती घेत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. सामना कसोटीच्या पहिल्या सामन्यात आर अश्विन संघात नव्हता. डे नाईट सामन्यात त्याला संधी मिळाली. तर गाब्बा कसोटीत त्याला प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळालं नाही. पण एडिलेड कसोटी त्याच्या क्रिकेट कारकिर्दीचा शेवट ठरली.रोहित शर्मा पत्रकार परिषदेत मोहम्मद शमीबद्दल बोलला. शमीविषयी अपडेट मागताना हे सुद्धा सांगितलं की, शमी सध्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळत आहे. पण त्याला याविषयी संबंधित काही समस्या आहेत. “एखादा खेळाडू भारतातून ऑस्ट्रेलियात आला, आणि सामन्यादरम्यान अचानक बाहेर गेला, तर ते सुद्धा योग्य नाही. अशा परिस्थितीत काय होतं? हे तुम्हाला माहितीय” असं रोहित शर्मा म्हणाला.भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर-गावस्कर सीरीज सुरु आहे. आतापर्यंत दोन्ही टीम्समध्ये तीन कसोटी सामने झाले आहेत. एकूण पाच टेस्ट मॅचची ही सीरीज आहे. सध्या दोन्ही टीम्स 1-1 अशा बरोबरीत आहेत. म्हणजे टीम इंडियाला मालिका विजयासाठी उर्वरित दोन कसोटी सामने करावे लागतील. फक्त मालिका जिंकायची आहे, म्हणूनच दोन कसोटी सामने जिंकायचे नाहीत, तर WTC फायनलच तिकीट मिळवण्यासाठी सुद्धा जिंकायच आहे. भारताला पुढच्यावर्षी WTC ची फायनल खेळायची असेल, तर ऑस्ट्रेलिया विरुद्ध पुढचे दोन कसोटी सामने जिंकावेच लागतील. चौकसोटी सामना मेलबर्नमध्ये आहे. पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने दमदार खेळ दाखवला. पण दुसऱ्या आणि तिसऱ्या सामना टीम इंडियाला लौकीकाला साजेसा खेळ करता आला नाही. आता मेलबर्न कसोटीआधी रोहित शर्माला आपला हुकूमी एक्का आठवला आहे.टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माने ऑस्ट्रेलिया विरुद्ध चौथ्या कसोटी सामन्याआधी मोहम्मद शमीबद्दल रोहित मागितले आहेत. “मला वाटतं आता योग्य वेळ आलीय. शमीबद्दल ताजे अपडेट जाणून घेण्याची. NCA मधून कोणीतरी अचूक माहिती द्यावी” असं भारतीय कर्णधाराने म्हटलं आहे.
