पंजाबने 84 धावांत 6 विकेट गमावल्यानंतर गिलने मयंक मार्कंडेसोबत 63 धावांची भागीदारी केली. यासह प्रथम त्याने त्याच्या संघाचा धावसंख्या 150 च्या जवळ नेला. त्यानंतर त्याने सुखदीप बाजवासोबत 40 धावा जोडल्या. पण, तो 187 धावांवर बाद झाला, ज्यामध्ये त्याने 102 धावांचे योगदान दिले. गिलच्या पंजाब संघाने कसा तरी 200 धावांचा टप्पा ओलांडला. पण गिल आऊट होताच उर्वरित फलंदाजही लवकर बाद झाले. उर्वरित विकेटही पुढील 26 धावांतच पडल्या. संपूर्ण पंजाब संघ 213 धावांवर ऑलआउट झाला. अशाप्रकारे, त्यांना एक डाव आणि 207 धावांनी दारुण पराभवाला सामोरे जावे लागले.बंगळुरूमध्ये खेळल्या जाणाऱ्या सामन्यात पंजाब संघाला प्रथम फलंदाजी करण्याची संधी मिळाली. पण कर्नाटकने त्यांचा पहिला डाव फक्त 55 धावांत गुंडाळला. त्यानंतर कर्नाटक संघाने पहिल्या डावात 475 धावांचा मोठा स्कोअर केला. ज्यामुळे त्यांना 420 धावांची आघाडी मिळाली आणि पंजाबचा संघ बॅकफूटवर गेला. दुसऱ्या डावात पंजाबच्या फलंदाजांनी पुन्हा एकदा दबावाखाली आपल्या विकेट गमावल्या. अर्धा संघ 65 धावांवर तंबुत गेला होता. मुख्य फलंदाजांमध्ये फक्त शुभमन गिल उरला होता, जो ओपनिंगला आला होता. त्याने हार मानली नाही आणि शतक झळकावले. शुभमनने कठीण परिस्थितीतही शानदार खेळ करत हे शतक ठोकले. टीम इंडियासाठी दिलासादायक बातमीशुभमन गिलचे फॉर्ममध्ये पुनरागमन ही भारतीय संघासाठी दिलासादायक बातमी आहे. गिलला चांगली कामगिरी करता आली नाही, पण आता शुभमन गिलनं रणजीत शानदार शतक ठोकलं आहे, ज्यामुळे गिल आता इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतही हाच फॉर्म कायम ठेवू इच्छितो. त्याच वेळी, चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सलामीवीर म्हणून गिलवर मोठी जबाबदारी असेलरणजी ट्रॉफीमध्ये उत्तर प्रदेश आणि बिहार यांच्यात सामना खेळला जात आहे. ज्यामध्ये उत्तर प्रदेशचा कर्णधार आर्यन जुयालने शानदार द्विशतक झळकावून बिहारच्या गोलंदाजांचे कंबरडे मोडले. त्याने 256 चेंडूंचा सामना केला आणि 18 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने नाबाद 200 धावा केल्या. आयपीएल 2025 पूर्वी जुयालच्या बॅटमधून झळकलेले हे द्विशतक लखनऊ सुपर जायंट्स कॅम्पसाठी आनंदाची बातमी आहे. आर्यन जुयाल आयपीएल 2025 मध्ये लखनऊ सुपर जायंट्सकडून खेळताना दिसणार आहे. यापूर्वी तो 5 वेळा चॅम्पियन असलेल्या मुंबई इंडियन्सचा भाग होता.2018 मध्ये देशांतर्गत क्रिकेटमध्ये प्रवेश करणाऱ्या तरुण जुयालने 2019 मध्ये वयाच्या 17 व्या वर्षी उत्तर प्रदेशकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने आतापर्यंत 25 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 40 पेक्षा जास्त सरासरीने 1661 धावा केल्या आहेत. या काळात त्याच्या बॅटमधून 6 शतके आणि 6 अर्धशतके झाली आहेत. या 6 शतकांमध्ये 2 द्विशतकांचा समावेश आहे. 2018 मध्ये 19 वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकणाऱ्या भारतीय संघात आर्यन जुयाल देखील होता. यानंतर, देशांतर्गत क्रिकेटमधील त्याच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर त्याने आयपीएल 2023 मध्ये मुंबई इंडियन्समध्ये स्थान मिळवले आणि आता तो लखनऊ सुपर जायंट्स संघाचा भाग आहे.